हे पुस्तक म्हणजे महान पुरुषांच्या कार्याची आणि विचारांची लेणी आहेत
विचारांचा धागा पुढे गुंफत नेताना प्रत्येक महापुरुषाच्या सामर्थ्याला एका लेखामधून कवेत घेणे ही अवघड बाब. परंतु नेमकेपणाच्या बांधीव शैलीतून लेखकांनी हे सामर्थ्य मोठ्या कष्टाने पेलले आहे. हे पुस्तक म्हणजे महान पुरुषांच्या कार्याची आणि विचारांची लेणी आहेत. महापुरुषांच्या विचारकार्याला समजून घेत पुढे पुढे नेणारा हा प्रवाह परिवर्तनवादी माणसांच्या जीवन जाणीवेला जागा करणारा अतिशय महत्त्वाचा दस्तावेज आहे.......